आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जाधव बॅकफूटवर, शिवसेनेशी पुन्हा सुत जुळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठीची विकास आघाडी माघारी घेऊन शिवसेना पक्षाचीच धुरा सांभाळून शिवसेना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचाच प्रचार करणार असल्याची माहिती आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री कदमांनी आगामी निवडणूकांची धुरा माझ्यावर सोपवल्याने मी हा निर्णय घेतल्याचेही आ. जाधव यांनी सांगितले. परंतू बुधवारी जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीत कन्नडचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव झाल्याने आमदारांनी पुन्हा शिवसेनेशी सुत जळवले असल्याची चर्चा शहरात होती.

जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, नगरपालिका आणि मार्केट कमिटी या निवडणुका स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे धोरण असून आगामी नगर परिषद आणि मार्केट कमिटी या दोन्ही निवडणुका आ. जाधवांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केल्याने स्थापन करण्यात आलेली विकास आघाडी मागे घेत असल्याचे आ. जाधव यांनी नमूद केले.

दरम्यान, कन्नड नगरपालिकेच्या राजकीय मोर्चेबांधणीसाठी शिवसेना नेते तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, वरिष्ठांनी डोळेझाक केली, स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाकारात्मकता पाहता विकासमहर्षी रायभानजी जाधव विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. सदर आघाडी शहरापुरती मर्यादित होती, असे त्या वेळी जाधवांनी स्पष्ट केले होते.
बातम्या आणखी आहेत...