आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत जोरदार पावसाची सलामी झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/औरंगाबाद- बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात सोमवारी सायंकाळी मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. रोहिण्यांनी दगा दिल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मृग नक्षत्राने दिलासा दिला. दरम्यान, औरंगाबाद शहरासह परिसरात वादळी वार्‍यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

औरंगाबाद परिसरात रात्री साडेआठ वाजता वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. वार्‍याचा जोर जास्त असल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. औरंगाबाद तालुक्यातील सावंगी, करमाडलाही पावसाने हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत 57.8 मिमी पावसाची नोंद झाली. बीड, धारूर, वडवणी तालुक्यांत सोमवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. झाडे उन्मळून पडल्याने बीड-परळी महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली.