आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर ओसरला, नांदेड ते नागपूर मार्ग दोन दिवसांनंतर सुरळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत चालली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 24 तासांत हिमायतनगर वगळता जिल्ह्यात कोठेही पावसाने हजेरी लावली नाही. 1 आॅगस्टपासून पैनगंगेच्या पुरामुळे ठप्प झालेला नांदेड-नागपूर मार्ग शनिवारी दुपारी 3 वाजता सुरू झाला.

इसापूर धरण 88.7934 टक्के भरले आहे. 8 दरवाजे 1 मीटरने व 5 दरवाजे 0.5 मीटरने उघडले असून नदीपात्रात 866.100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीचा पूर ओसरत चालल्याने हदगाव, हिमायतनगर, किनवट तालुक्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती निवळत चालली आहे. जिल्ह्यातील सर्व भागांतील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी हिमायतनगर,किनवट तालुक्यांत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. किनवट येथे आमदार प्रदीप नाईक त्यांच्यासोबत होते.

मंगळवारनंतर सूर्यदर्शन:मंगळवारपासून जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराचे थैमान सुरू आहे. तेव्हापासून जिल्ह्यात सूर्यदर्शन नव्हते. शनिवारी प्रथमच सूर्यदर्शन झाले. दिवसभर ऊन असल्याने पावसाळ्यामुळे हवेतील गारवाही कमी झाला.