आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलीसाठी सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील सामान्य रुग्णालयातील अपंग असलेल्या सेवकाने मंगळवारी सकाळी साफसफाईचे फिनेल औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आजारी पालकांची सेवा करता यावी म्हणून वसमत येथे बदली करावी यासाठी वरिष्ठांकडे केलेल्या अर्जाची दखलच घेतली जात नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

प्रकाश दत्तराव वाघमारे (३५ , रा. नांदेड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाच वर्षांपासून वाघमारे येथील सामान्य रुग्णालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. ते अपंग असून त्यांचे आई-वडील आजारी असतात. पालकांची सेवा करता यावी व नांदेडहून ये-जा करता यावी यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज केला होता.
बातम्या आणखी आहेत...