आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यात दोन तालुक्यांत अतिवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- गणेश आगमनासोबत पावसाचे पुनरागमन झाले असून शुक्रवारी रात्रभर पावसाने मुक्काम ठोकला. काही ठिकाणी मध्यम स्वरूपात कोसळलेला हा पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीच्या रूपाने बरसला आहे. शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यांतील रेणापूर शहर, उजेड, वलांडी, बोरोळ, साकोळ येथे अतिवृष्टी झाली आहे.
 
शिरूर अनंतपाळमध्ये ७५ मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात शनिवार सकाळपर्यंत सरासरी ८९.६७ मिमी पाऊस पडला, तर देवणी तालुक्यात ९२.६६ मिमी पावसाची नोंद झाली. रेणापूरमध्ये ११० मिमी, उजेडमध्ये ११०, वलांडीत १०९, बोरोळमध्ये ८१, साकोळमध्ये ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४२.५८ मिमी पाऊस झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...