आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस, नांदेड शहरात दोन तास जोरदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे वरुणराजाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टी होऊन सरासरी ६६.८० मिमी बरसात झाली.

जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असली तरी नुकसान मात्र कोठेच झाले नाही. कारण मंगळवार दुपारनंतर ते बुधवार सकाळपर्यंत संततधार सुरू होती. आजपर्यंत ६६२. ५५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या ७८.८६ टक्के इतकी नोंद झाली आहे.

निलंगा तालुक्यात ९६ मिमी
निलंगा तालुक्यात सर्वाधिक ९६.३८, तर सर्वात कमी ३८.६३ िममी पावसाची नोंद लातूर तालुक्यात झाली. लातूर-३८.६३, औसा-५७.४३, रेणापूर- ४८.५०, उदगीर-९०.००, अहमदपूर- ५९.८६, चाकूर- ७७.३३, जळकोट-५५.५०, निलंगा- ९६.३८, देवणी- ५२.६७ िममी पावसाची नोंद झाली.

नांदेड शहरात दोन तास जोरदार
नांदेड -
शहर व परिसरात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तीन वाजेपर्यंत बरसत होता. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या मागील २४ तासांत एकूण ९०.५० मिलिमीटर पाऊस झाला असून दिवसभरात सरासरी ३१.७१, तर आतापर्यंत सरासरी ७२४.७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोलीत सर्वदूर दमदार
हिंगोली -
बुधवारी दुपारी चारनंतर जिल्हाभरात पाचही तालुक्यांत दमदार पाऊस झाला. हिंगोली शहरात साडेचारनंतर विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर चांगला पाऊस झाला.

उस्मानाबादेत २२ मिलिमीटर
उस्मानाबाद -
मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली नसली तरी करपण्यापासून वाचलेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...