आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीच पाणी...यंदा लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ओसंडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे, साठवण, पाझर आणि लघु तलाव तसेच रेणा, मांजरा, तावरजा आणि तेरणा या नद्यांवरील सगळे उच्चस्तरीय बंधारे १०० टक्के भरले आहेत. या सर्व प्रकल्पांत आजघडीला ८३३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ यंदा मात्र पूर्णपणे हटला आहे.

लातूर जिल्ह्यात दोन मोठे, आठ मध्यम प्रकल्प आहेत. साठवण तलाव, पाझर तलाव आणि लघु तलावांची संख्या १३२ आहे. त्यांच्या जोडीला मांजरासह सगळ्याच मोठ्या नद्यांवर उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आले आहेत. जुलैअखेरचा पाऊस आणि त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सगळेच प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची एकूण क्षमता ८३३ दलघमी इतकी आहे. हे प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे आजघडीला जिल्ह्यात ८३३ दलघमी पाणीसाठा प्रकल्पांत उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्यातून या वर्षी शेतीला सिंचनासाठी पाणी देता येणार आहे. मांजरा आणि तेरणा या दोन मध्यम प्रकल्पांसह आठ मध्यम प्रकल्पांतील पाणी सिंचनासाठी सोडण्याची सोय उपलब्ध आहे. साठवण तलावातील पाणीही काही प्रमाणात शेतीच्या सिंचनासाठी वापरता येते.

जलयुक्तचे पाणी शिल्लकच
गेल्या चार वर्षांच्या अवर्षण काळात नदी-नाले खोलीकरणाची कामे करण्याबरोबरच शेततळी उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. गेल्या महिन्यातील पावसामुळे जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा तयार झाला आहे. या पाण्याची मोजदाद करणे शक्य नसल्यामुळे हे पाणी शिल्लकच राहिले आहे. त्याचबरोबर विहीर पुनर्भरण, शेततळ्यांमुळे त्यातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. दिवाळीनंतर आणखी एखादा पाऊस पडण्याची चिन्हे असून पाणीसाठ्यात वाढच होणार आहे. त्याचबरोबर मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या नद्यांवर बंधाऱ्यांची शंृखला उभी करण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे ३० दलघमीपेक्षा जास्त पाणीसाठा नदीपात्रात शिल्लक आहे.

१०० टक्के पाणीसाठा उपलब्ध
तावरजा,रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, शिरूर अनंतपाळ, घरणी आणि मसलगा या मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता १४७ दलघमी असून तेवढे पाणी उपलब्ध आहे. सर्व प्रकल्प यंदा ओसंडून वाहिले आहेत, तर १३२ साठवण, पाझर आणि लघु तलावांची क्षमता ४१ दलघमी असून तितके पाणी उपलब्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...