औरंगाबाद - मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर शुक्रवारीही कायम होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत बीड जिल्ह्यात २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या शहरातही पाणीच पाणी झाले. २७ वर्षांनंतर शहरात असा पूर पाहावयास मिळाला. म्हणजे सुमारे दीड पिढीने प्रथमच शहरात पाणी वाहताना पाहिले. लातूर जिल्ह्यातही सहा मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड व परभणी जिल्ह्यांनाही पावसाने चांगलेच झोडपले.
या चोवीस तासांत तुलनेने जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. या पावसामुळे जलसाठ्यांतही चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात नदी-नाले ओसंडून वाहत अाहेत. दरम्यान, येत्या ४८ तासांत मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली अाहे.
> नांदेड : ९०% पाऊस
> जालना : सरासरी पार
> लोअर दुधना ९० टक्के
> लातूर : नद्यांना पूर
> २०१० नंतर प्रथमच
> पैठण शहर, तालुक्यात धुव्वाधार, दुकानांत पाणी
> मराठवाड्यातील पर्जन्यमान (से.मी.)