आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या सरपंचपदासाठी ग्राम पंचायत सदस्यांना घडवली हेलिकॉप्टर सफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी दुपारी परळी येथे खासगी हेलिकॉप्टरने दाखल झाले. - Divya Marathi
गुरुवारी दुपारी परळी येथे खासगी हेलिकॉप्टरने दाखल झाले.
परळी - गावाच्या सरपंचपदी आईला संधी मिळावी यासाठी पुत्राने पाच ग्रामपंचायत सदस्यांना परळी ते पुणे अशी हवाई सफर घडवली. पाच दिवसांपासून सहलीवर असलेले ग्रामपंचायत सदस्य गुरुवारी दुपारी परळी येथे खासगी हेलिकॉप्टरने दाखल झाले. सरपंचपदाची निवड शुक्रवारी होणार आहे.

परळीजवळील कन्हेरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच कुसुमबाई नारायण मुंडे यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला. हे पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने गावात चांगलीच रस्सीखेच होती. हे पद आपली आई प्रभावती श्रीराम फड यांच्याकडे यावे म्हणून रासप युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी पाच ग्रामपंचायत सदस्यांना हवाई सफरीसह पाच दिवसांची सहल घडवली. गुरुवारी दुपारी दीड वाजता हेलिकॉप्टरने ते सर्व परळीत दाखल झाले. वैद्यनाथ कॉलेजसमोरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्यानंतर एकच गर्दी झाली. निवडणुकीसाठी एकच दिवस असल्याने ग्रामपंचायत सदस्यांना अज्ञातस्थळी वाहनाने नेण्यात आले आहे.
सरपंचपदाची आज निवड
सरपंचपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी बारा वाजता बैठक आहे. दुपारी दोन वाजता निवड प्रक्रिया होईल.
आईचीही होती इच्छा
आईची हवाई सफरीची इच्छा आणि सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी या गोष्टी राजाभाऊ फड यांनी हेलिकॉप्टर सफरीतून पूर्ण केल्या.