आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांमुळे हिमायत गुन्हेगारीकडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- हिमायत बेग बीडला असताना शेजारीच राहत असलेल्या मित्रांशीच त्याचा संपर्क आला. या संपर्कातूनच त्याने काही दिवस वाचनालयही चालवले. गुजरातमधील दंगलीची छायाचित्रे, कॅसेट व पुस्तकांच्या माध्यमातून वेगळ्याच विचाराने काही तरुणांचा ग्रुप तयार झाला. हिमायत बेग हा जबिउद्दीन अन्सारी व फय्याज कागजी या मित्रांसोबत गुन्हेगारीकडे वळला.

शहरातील कमवाडा भागात हिमायतचे वडील मिर्झा बेग यांचे घर आहे. 38 वर्षांपासून ते जिलेबी विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून थोडेफार पैसे जवळ आल्यानंतर त्यांनी सन 2004 मध्ये शहरातील कारंजा भागात क्वालिटी जिलेबी नावाचे दुकान सुरू केले. यातून दिवसभरात 200 रुपये त्यांना मिळतात. मिर्झा बेग यांना तीन मुले व दोन मुली. तारेक हा त्यांना व्यवसायात मदत करतो, तर शहेजाद वाहनचालक आहे. हिमायतचे शिक्षण 12 वीपर्यंत बीडच्या मिल्लीया कॉलेजमध्ये झाले. पुढे त्याने पुण्याला डीएड केले. जबिउद्दीन अन्सारी, फय्याज कागजी, शेख मसूद शेख अहमद, शेख एजाज शेख रहीम हे सर्व वाचनालयाच्या माध्यमातून एकत्र आले. सन 2004 ते 2005 मध्ये त्यांच्या बैठकाही होत असत. गुजरात दंगलीनंतर महाराष्‍ट्रात जी छायाचित्रे, कॅसेट आल्या ते पाहून हे सर्व मित्र दहशतवादी कारवायाकडे वळले, असे पोलिसांनी सांगितले.

उदगीरमध्ये रचला स्फोटाचा कट
2009 ते 2011 मध्ये तो बीडला लपतछपत येत होता. पुढे तो पुण्याला काही दिवस गेला. पुण्याहून उदगीरला आला. 2009 ते 2010 च्या काळात उदगीरला त्याने इंटरनेट कॅफे चालवला. येथेच त्याने पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट रचला.

दहशतवादी कारवायांत मित्रांचा सहभाग
2006 मध्ये औरंगाबादच्या वेरूळमध्ये पक डल्या गेलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात जबिउद्दीन अन्सारीसह महंमद फय्याज कागजी, शेख एजाज, शेख मसूद यांची नावे एटीएसकडून समोर आली होती. एजाज व मसूद फरार आहेत, तर जबिउद्दीन अन्सारी मुंबई बॉम्बस्फोटात अटकेत आहे.

दाद मागणार
हिमायत बेगप्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली जाईल. आताच काही सांगू शकत नाही.’’
तारेक बेग, हिमायतचा भाऊ