आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतनगरच्या रणरागिणींनी फोडल्या दारूच्या बाटल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हिमायतनगरसह तालुक्यात दारूबंदी करा, या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. दारूबंदीसाठी सरसावलेल्या महिलांनी रविवारी हिमायतनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारूच्या बाटल्या फोडून आंदोलन केले.
हिमायतनगरात परमेश्वर मंदिर, पोलिस ठाणे, हनुमान मंदिर, बौद्ध समाजमंदिर, ग्रामीण रुग्णालयाजवळ परवानाधारक दारूची पाच दुकाने आहेत. याशिवाय गावात व ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सकाळी 6 पासून ते रात्री 12 पर्यंत दारूची विक्री होत असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद््ध्वस्त झाले आहेत. याविरोधात 30 एप्रिलपासून शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या शिवानी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दारूबंंदीविरोधात आंदोलन सुरू आहे. 1 मे रोजी ग्रामपंचायतीने ठराव करून पाठवला. 26 जूनला तहसीलदार अरुणा संगेवार यांना निवेदन देण्यात आले. 5 जुलैला दारूबंदी समर्थक महिलांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरपंच गंगाबाई शिंदे, पंचफुलाबाई लोणे, त्रिवेणी भडके, बेबीताई भारती, द्रौपदाबाई तुंगेवार, कमलताई भंडारवाड, सिंधूताई निंबेकर या महिलांनी सहभाग घेतला.