आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्म विज्ञाननिष्ठच आहे, अंधश्रद्धेचे खूळ काढून टाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरोहित महासंघाच्या वतीने गोविंदबुवा जोशी यांना विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करताना भरतबुवा रामदासी, पोपटशास्त्री चौथाईवाले, अमृत महाराज जोशी, प्रकाश सोळंके, मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील आदी. - Divya Marathi
पुरोहित महासंघाच्या वतीने गोविंदबुवा जोशी यांना विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करताना भरतबुवा रामदासी, पोपटशास्त्री चौथाईवाले, अमृत महाराज जोशी, प्रकाश सोळंके, मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील आदी.
माजलगाव - हिंदू धर्म हा विज्ञाननिष्ठच असून हा धर्म अंधश्रद्धा पाळतो हा गैरसमज असून हे खूळ काढून टाकण्याची गरज असल्याचे मत पोपटशास्त्री चौथाईवाले यांनी विविध दाखले देत व्यक्त केले.

पुरोहित महासंघाच्या वतीने बुधवारी येथील राजस्थानी मंगल कार्यालयात वेदशास्त्र संपन्न गोविंदबुवा जोशी यांचा विद्यारत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी पोपटशास्त्री चौथाईवाले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी उपस्थित होते. या वेळी महामंडलेश्वर अमृत महाराज, सुधाकर शास्त्री धर्मापुरीकर, पुरोहित महासंघाचे जिल्हाध्यक्ष कडेकर, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण पाटील, मोहनराव सोळंके, डॉ. प्रकाश आनंदगावकर, अनंतशास्त्री जोशी उपस्थित होते.

या वेळी पोपटशास्त्री चौथाईवाले यांनी हिंदू धर्म विज्ञाननिष्ठ असल्याचे स्पष्ट करताना विविध दाखले दिले. ते म्हणाले, हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या देवाच्या तीर्थामध्ये विविध धातूंची पूजा केल्यानंतरचे अर्क असते. त्याचे प्राशन आरोग्यास हितकारक असते. ही अंधश्रध्दा नसून विज्ञाननिष्ठता असल्याचे ते म्हणाले. या वेळी सुधाकर शास्त्री धर्मापुरीकर यांनी गोविंदबुवा हे ज्योतिष्यशास्त्र, भागवतकार, वेद संपन्न असे त्रिवेणी अमौलिक व्यक्तिमत्त्व असल्याचा उल्लेख केला. या वेळी अमृत महाराज जोशी, कडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना गोविंदबुवा जोशी यांचा गौरव केला.

संचालन महेश खामगावकर यांनी केले, प्रास्ताविक प्रणव पटवारी यांनी तर ऋषिकेश पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनंतशास्त्री जोशी, पांडुरंग कुलकर्णी, संदीप मुळी, योगेश जोशी, संतोष नाथ्रेकर, किशोर जोशी, मयूर मुळे, पुरुषोत्तम जयगावकर आदींनी परिश्रम घेतले.

संस्कृतीचे जतन करा
पुरोहितांनी धर्माचरण करून तेज वाढवावे जगात आदर्श दाखवावा. मागील अनेक वर्षांपासून माजलगावचे नाव राज्यासह परराज्यात नेऊन धर्माचा वैदिकतेचा प्रसार केला हा वारसा पुरोहित महासंघाने सुरु ठेवावा. नूतन तालुकाध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून संस्कृती जतन करण्याचे काम करावे. सत्कारामुळे मी भारावलो
आहे.’’ - गोविंदबुवा जोशी, माजलगाव
बातम्या आणखी आहेत...