आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधन शोधणार्‍यांना पोलिस कोठडीची हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम करणार्‍या आठही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी केवळ लालसेपोटी खोदकाम केले असल्याचे सांगून यापूर्वी तसा प्रयत्न केला नसल्याचेही सांगितले.

मंगळवारा भागात गुप्तधनासाठी खोदकाम चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या फौजदार प्रियंका पाटकर यांच्या पथकाने घरमालक अमोलचंद नारायण कंदी, त्याचा मुलगा नमित कंदी, शेख मुसा, शेख फरजानाबी, शेख मिनाज, शेख बशीर, शेख अमीन, शेख रियाज यांना रंगेहाथ पकडले. मांत्रिकाचे सर्व साहित्य, लिंबू, मिरच्या, गुलाल-बुक्का व खोदकामाच्या साहित्यासह ताब्यात घेतले होते.