आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीचा वाद; हाणामारीत भावासह पुतण्याचा खून, 3 जण गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - शेतीच्या वादातून तालुक्यातील जामठी (बु.) येथील शिवारात शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास दोन गटांत झालेल्या वादात लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून सख्खा भाऊ आणि पुतण्याचा खून करण्यात आला. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत येथील ग्रामीण पोलिसांत सायंकाळी उशिरा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अंबादास भवर व त्यांचा भाऊ प्रल्हाद यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. दुपारी १२ वाजता याच कारणावरून अंबादास व प्रल्हाद यांचा शेतात वाद झाला. दोन्ही भावांची मुले व महिलांमधील वादाचे पर्यवसान दोन गटांतील तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली. या घटनेत अंबादास
आबाजी भवर (६०) व त्यांचा मुलगा उद्धव (२५) यांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर अंबादास यांचा दुसरा मुलगा संजय, दुसऱ्या गटातील प्रल्हाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मृत उद्धवची पत्नी अयोध्याबाईने दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हाद आबाजी भवर, आत्माराम भवर, रामप्रसाद भवर, बालाजी भवर, सोपान भवर, विठ्ठल दाजीबा घ्यार, नामदेव दाजीबा घ्यार, सुगबाई प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, पार्वती माधव भवर यांच्याविरुद्ध खून व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.