आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत मानापमानातून हाणामारी, दोघांचा खून, चार गंभीर; कुऱ्हाड, तलवारीने केले वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शहरातील कालीमता मंदिर भागातील मोचीगल्ली येथे काल (गुरुवारी) १०.४५ च्या सुमारास मोची समाजातील दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन तरुणांना जीव गमावावा लागला. तर मारामारीत जखमी झालेल्या १८ जनांपैकी ३ ते ४ जन नांदेड येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

भावकितील शुल्लक वादाची गेल्या दोन वर्षातील धुसफूस अखेर दोघांच्या खूनाने काहीही शमली असली तरी दोन्ही गट अजूनही ’मरो या मारो’ ची भाषा करीत असल्याने मोची गल्लीत पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

काय आहे प्रकरण?
मोची गल्लीत खासगी मालमत्ता, समाजाचे सार्वजनिक कार्यक्रम आदी बाबींवरून गेल्या दोन वर्षांपासून धुसफूस चालू आहे. यापूर्वी या दोन्ही गटात लहान मोठे वाद होवून सुरू शुल्लक भांडणेही झाली. परंतु वाद काही मिटत नसल्याने, गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटांनी हातात मिळेल ते शस्त्र घेतले आणि एकमेकांवर चाल केली.

कुऱ्हाडी, चाकू, तलवारी, खिळे ठोकलेले राफ्टर, कातडी कापायची रापी, कोयात्याचा मुक्त वापर करीत एकमेकांवर तुटून पडलेल्या दोन्ही गटांनी पूर्ण ताकदीनिशी फ्री स्टाईल हणामारी केली. घटनास्थळापसून जवळच गांधी चौकात दहीहांडीचा कार्यक्रम चालू होता. महिलांचा आक्रोश ऐकून दहीहंडी कार्यक्रमातील जमाव आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जमावाने भांडणे सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गट कोणाचेच ऐकत नसल्याने जास्त पोलिस बोलावण्यात आले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांना काबूत आणले.  त्यानंतर जखमींना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांना प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे पाठविण्यात आले.

दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू
जितू प्यारेलाल कुरील (२७) व महावीर गजू कुरील (२५) या दोंघाचा नांदेड येथे उपचारापूर्वीच रुंगणालयात मुत्यु झाला.  या दोघांचे शवविच्छेन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी हिंगोलीत आणण्यात आले असून अंत्यविधी कार्यक्रमात वाद होवू नयेत यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जखमींची संख्याही मोठी
या मारामारीत जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे. मारामारीत लहान मोठे सर्वच सहभागी झाल्याने साधारणतः दोन्ही गटातील प्रत्येक घरातील एक जण जखमी झाला आहे. यामध्ये काही महिलांनाही मारहाण झाली आहे.

पवन हिरालाल कुरील, विनोद प्यारेलाल कुरील, कालीचरण फकिरचंद कुरील, बजरंग मंगीलाल कुरील, राजू प्यारेलाल कुरील, हिरालाल चन्नालाल कुरील, अरुण हिरालाल कुरील, गजानन शीतला कुरील, अनंत सत्यनारायण कुरील, शाम महादेव कुरील, पवन फकीरचंद कुरील, जितेंद्र प्यारेलाल कुरील, विजय प्यारेलाल कुरील हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जण नांदेड येथील रुग्णालयात अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहेत.

पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, शहर पोलिस ठाण्याचे पीआय अशोक मैराळ आदींनी या भागात प्रत्यक्ष भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली.

संबंधित घटनेचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...