आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार करून मुलीचा खून, दोन नराधमांना फाशीची शिक्षा, दोनच मिनिटांत सुनावली शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे सव्वा वर्षापूर्वी ४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. पी. दिवटे यांनी दोघांना दोषी ठरवून शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या मुलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.  भागवत क्षीरसागर आणि राहुल ऊर्फ संदीप क्षीरसागर अशी दोषींची नावे आहेत.
 
वारंगा मसाई येथे सव्वा वर्षापूर्वी सिद्धी संभाजी क्षीरसागर (४ वर्षे ४ महिने) या मुलीवर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. याबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात पीडितेच्या शेजारीच राहणारे भावकीतीलच भागवत परबती क्षीरसागर व राहुल ऊर्फ सतीश बबन ऊर्फ मसाजी क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, तर या दोन्ही आरोपींचे आई-वडील व नातेवाइकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पुरावे नष्ट करण्याची तजबीज करणे असे गुन्हे दाखल झाले होते. पीआय मुकुंद देशमुख, डीवायएसपी पी. वाय. मोरे आणि तपासाधिकारी फौजदार प्रेमलता गोमासे यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा करून येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. पी. दिवटे यांच्या न्यायालयात बालसंरक्षणचा विशेष खटला चालविण्यासाठी आरोपपत्र दाखल केले. खटल्याचा निकाल लागेपर्यंत दोन्ही मुख्य आरोपींना जामीन मिळाला नाही. एका वर्षात निकाल लागलेल्या या खटल्यात २५ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच तपासाधिकारी प्रेमलता गोमासे यांचा तपास आणि सरकार पक्षातर्फे अॅड. ज्ञानेश्वर टेकनूर यांनी मांडलेली सरकार पक्षाची बाजू महत्त्वाची ठरली. त्यानुसार गुरुवारी न्यायाधीश दिवटे यांनी आरोपींना दोषी ठरविले आणि शुक्रवारी दोन्ही मुख्य आरोपींना विविध कलमान्वये सक्तमजुरी, जन्मठेप आणि फाशीची शिक्षा ठोठावली.
 
 घटनेची पार्श्वभूमी  
७ जानेवारी २०१६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास संभाजी हिराजी क्षीरसागर (२८) हा पार्डी येथे रोज मजुरीचे काम करण्यासाठी गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मित्र मसाराव वाघमारे याने मोबाइलवर सांगितले, की तुझी सिद्धी नावाची मुलगी बराच वेळाची घरी नाही. त्यामुळे संभाजी याने त्याचा भाऊ अंकुश याला मोबाइल फोनवरून मुलीचा शोध घेण्यास सांगितले आणि तो सुद्धा घरी परतला. त्यानंतर संभाजीची सावत्र आई गयाबाई हिने सांगितले, की सिद्धी ही अंगणवाडीतून दुपारी १२ वाजता घरी आली होती. तिने जेवण केले आणि बहिणींसोबत खेळत होती. तेवढ्यात त्याच्या शेजारीच राहणारे भागवत परबती क्षीरसागर व राहुल ऊर्फ सतीश बबन ऊर्फ मसाजी क्षीरसागर या दोघांनी चॉकलेट देतो असे म्हणून सिद्धीला सोबत नेले होते असे सांगितले. त्यानंतर संभाजी, त्याची सावत्र आई गयाबाई, आई काशीबाई, पत्नी छायाबाई, भाऊ अंकुश आणि मित्र मसाराव यांनी मुलीची आणि भागवत व राहुल ऊर्फ सतीश यांची शोधाशोध केली. परंतु मुलगी सापडली नसल्याने संभाजी क्षीरसागर यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात त्याच दिवशी रात्री मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ग्रामस्थ व पोलिसांनी रात्रीच परबती क्षीरसागर याच्या घराची झडती घेतली असता, पांढऱ्या रंगाचे पोतडे आढळले. पोतडे उघडले असता त्यात मृतावस्थेत आढळून आली. मृतदेहाची तपासणी केली असता, तिच्या तोंडात कापसाचा बोळा निघाला, तसेच गुप्तांग व शरीरावर मोठ्या जखमा आढळून आल्या. त्यानंतर संभाजीने कळमनुरी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार भागवत परबती क्षीरसागर व राहुल ऊर्फ सतीश बबन ऊर्फ मसाजी क्षीरसागर यांच्याविरुद्ध मुलीला पळवून नेऊन बलात्कार, अमानवी कृत्य आणि खून केल्याचा भादंवि व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला, तर परबती क्षीरसागर, पंचफुलाबाई परबती क्षीरसागर, कवीनारायण क्षीरसागर, बबन ऊर्फ मसाजी क्षीरसागर व शोभा बबन क्षीरसागर या पाच आरोपीविरुद्ध लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा बलप्रयोग करणेबाबत व अपराध्याला वाचविण्यासाठी पुरावा नाहीसा होण्याची तजबीज करणे किंवा खोटी माहिती देणे यासाठी भादंविच्या कलम ३५३, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. पी. दिवटे यांच्या न्यायालयात चालले. गुरुवारी न्यायाधीश दिवटे यांनी दोन्ही मुख्य आरोपींना दोषी ठरविले, तर उर्वरित पाच आरोपींना त्याच दिवशी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. तर शुक्रवारी दोन्ही आरोपींना भादंवि ३६३ मध्ये ७ वर्षे, ३६६ मध्ये १० वर्षे, ३७६ व ३७७ मध्ये आजन्म कारावास तर ३०२ मध्ये मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दोनच मिनिटांत सुनावली शिक्षा आणि दुर्मिळातील दुर्मिळ, मोठा बंदोबस्त...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...