आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकखाली सापडून हिंगोलीत मुलगी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शहराजवळील गारमाळ भागात अकोला-नांदेड बायपास मार्गावर गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ट्रकखाली सापडून शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली. फिरदोस लतीफ प्यारेवाले असे मुलीचे नाव आहे. ती येथील आदर्श विद्यालयात ९ वी इयत्तेत शिक्षण घेत होती. फिरदोस प्रातर्विधीसाठी जाण्यासाठी घराबाहेर पडली असता भरधाव ट्रकने (एपी १६ टीजी २३९४) तिला चिरडले.