आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली : महिला नगराध्यक्षांची ‘सीओं’ना मारहाण; पतीनेही हात केला साफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - विकासकामांच्या निधीवरून झालेल्या वादानंतर नगराध्यक्षा अनिता सूर्यातळ आणि त्यांचे पती सदाशिव सूर्यातळ यांनी मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहात मारहाण केली. गुरुवारी रात्रीच्या या प्रकारानंतर दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
नगर परिषदेतर्फे रस्ते, नाली बांधकाम आदी कामे सुरू आहेत. त्यांचा निधी खर्च करण्यावरून नगराध्यक्षा अनिता सूर्यातळ आणि त्यांचे पती सदाशिव सूर्यातळ यांचा मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्याशी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान ३० एप्रिलला रात्री मारहाणीत झाले. यलगट्टे यांनी शहर पोलिस ठाण्यात सूर्यातळ दांपत्याविरुद्ध तक्रार दिली. "तू राजेश राठोडला चेक का दिला?' अशी विचारणा करत त्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून सूर्यातळ दांपत्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यलगट्टे यांनी तक्रार दिल्याचे कळताच अनिता सूर्यातळ यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली. विकासकामांबद्दल विचारणा केली असता यलगट्टे यांनी जातिवाचक शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे तक्रारीत म्हटले आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नाही.