आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली झाल्याने पीआयची घोड्यावरून मिरवणूक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - बदली झाल्यामुळे औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पीआय विजय जोंधळे यांची घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढून सहकार्‍यांनी निरोप दिला. पीआय जोंधळे यांची औंढा पोलिस ठाण्यातून बदली झाली आहे.
गेली दोन वर्षे बॉसनी चांगले मार्गदर्शन केले, सहकार्य केले. त्यामुळे सहकार्‍यांनी बुधवारी औंढा नागनाथ येथे जोंधळे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली.
शहरातील मुख्य मार्गाने वाजतगाजत चाललेल्या मिरवणुकीचा समारोप पोलिस ठाण्यासमोर करण्यात आला.
त्यानंतर जोंधळे यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.