आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांच्या ट्रकमधील दाहक चित्र, कुणाचे पाय मोडले, तर कुणाच्या माना मुरगळल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली – मध्य प्रदेशातून हैदराबादला कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पोलिसांनी वाशिम रस्त्यावर अडवला. मध्य प्रदेशातील हा ट्रक अडवून पोलिसांनी फाटक उघडले तेव्हा दाहक चित्र समोर आले आहे. ट्रकमध्ये एकूण 54 गोवंश जनावरे भरलेली होती. त्यापैकी 30 जनावरांचा गुदमरून आणि उपासमारीने मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक अडवताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. 
 
 
- मध्यप्रदेशातून एक ट्रक जनावरांना कत्तलीसाठी हैदराबादच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 
त्यानुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीआय जगदीश भंडरवार यांच्या पथकाने जनावरे असणारा ट्रक (एमपी 9 – एचएच 0399) शहरात येण्यापूर्वीच पकडला. 
- ट्रकची तपासणी केली असता, त्यात मुंडके आणि चारही पाय बांधलेली जनावरे आढळून आली. यात गोऱ्हे, बैलांचा समावेश होता. मुंडके आणि चारही पाय बांधलेली जनावरे अक्षरशः एकमेकांवर फेकलेली होती. 
 
 
कुणाचे पाय मोडले, तर कुणाच्या माना मुरगळल्या...
- ट्रक चालक एकूण 54 जनावरे घेऊन निघाला होता. मात्र, उपासमारी आणि गुदमरल्याने त्यापैकी 30 जनावरांचा मृत्यू झाला. त्यात काहींचे पाय तुटले, तर काहींचे कंबरडे मोडले, तर काहींच्या माना मुरगळल्या गेल्या. 
- दोन वर्षांची गोऱ्हे ते वृद्ध झालेली ही जनावरे सुद्धी होती. गळ्यावर सुरी चालण्यापेक्षाही जास्त मरण यातना भोगणाऱ्या या मुक्या जीवांची ही अवस्था पाहून पोलिसही थक्क झाले. 
 
 
चालक पसार...
पोलिसांनी ट्रक अडवताच चालकाने ट्रक सोडून, मिळेल त्या रस्त्याने पोबारा केला. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलिसांनी प्राणी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून ट्रक आणि जनावरे ताब्यात घेतली आहेत. याबाबत येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली.
बातम्या आणखी आहेत...