आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतून उलट्या दिशेने उतरणे अंगलट, उमरखेड येथील महिलेचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - स्टेशनवरून गाडी निघाल्यानंतर झोपेतून उठून घाईने रेल्वेतून उलट्या दिशेने उतरल्याने फलाटावर जोरदार आदळून छातीला गंभीर दुखापत झालेल्या उमरखेड येथील महिलेचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास येथील रेल्वेस्थानकावर घडली. उमरखेड (जि. यवतमाळ) तालुक्यातील मारलेगाव येथील शांताबाई रामा पडघणे(६०) असे मृत महिलेचे नाव आहे. कुर्ला-अजनी या रेल्वेतून ती प्रवास करून गावाकडे जाण्यासाठी येथील स्थानकावर उतरली होती. रेल्वेगाडी साधारणत: ६.४० वाजता रेल्वेस्थानकावर आली होती. रेल्वे काही वेळ थांबून अकोल्याकडे जाण्यासाठी निघाली
असतानाच तिच्या नातेवाइकांनी तिला झोपेतून उठवले आणि उतरण्यास सांगितले.
रेल्वेसोबत पुढे निघून जाणार या चिंतेने घाईने ही महिला चालत्या गाडीतून उलट दिशेने उतरली. यात तिचा तोल जाऊन फलाटावर जोरात आपटली. महिला पडल्याने काही प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली. परंतु महिला स्वत:च उठून बसल्याने रेल्वे पुढे निघून गेली. त्यानंतर येथील रेल्वे पोलिस एस. जे. देशमाने व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिच्या नातेवाइकांना सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी येथील सरकारी रुग्णालयात नेले. छातीला गंभीर दुखापत झाल्याने योग्य ते उपचार करून तिला नांदेड
येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.