आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोलीत दोन ठिकाणी सत्तापरिवर्तन, खासदार सातव यांना जोरदार दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली : आजच्या नगर परिषद निकालात हिंगोली नगर परिषदेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने मिळवली असून कळमनुरीत काँग्रेसचा सफाया केल्यागत शिवसेनेने भगवा फडकावला. वसमत येथे शिवसेनेने आपली सत्ता कायम ठेवली आहे.
१० महिन्यांपूर्वी सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपने सत्ता हस्तगत केली. तर सोमवारी लागलेल्या तिन्ही नगर परिषदांच्या निकालात नगराध्यक्षांच्या तीन जागांपैकी कळमनुरी आणि वसमत या दोन जागा शिवसेनेने आणि हिंगोलीची जागा भाजपने मिळवली. त्यामुळे आता जिल्ह्यातील पाचही प्रमुख शहरांवर हिंदुत्ववादी पक्षांची सत्ता स्थापन झाली आहे. कळमनुरी या मुस्लिमबहुल शहरात १७ सदस्यांच्या सभागृहात ९ जागा मिळवत शिवसेनेने नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीतही स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हिंगोली येथे मात्र परिस्थिती उलट आहे. हिंगोलीत ३२ सदस्यीय सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १५ जागा पटकावल्या असून काँग्रेसने ४ जागा पटकावल्या आहेत. या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्ष अल्पमतात आहेत. वसमत येथेही २८ सदस्य असलेल्या सभागृहात काँग्रेसला ६ तर राष्ट्रवादीला ८ अशा १४ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ६ तर भाजपला ७ अशा १३ जागा मिळाल्या आहेत. कळमनुरी वगळता वसमत आणि हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सभागृहात मतदारांनी बहुमत दिले.
बातम्या आणखी आहेत...