आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स रॅकेटमधील चार धनाढ्य आरोपी फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील चर्चित सेक्स रॅकेटमधील धनाढ्य चार आरोपी १८ दिवसांनंतरही फरारच आहेत, तर उर्वरित सात आरोपींना जामीन मिळाला नसल्याने त्यांना जेलची हवा खावी लागत आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे तपासाधिकार्‍यांनी सांगितले.
अल्पवयीन दलित मुलीचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात ११ आरोपी आहेत. त्यापैकी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अटक झालेले बहुतांश आरोपी मालदार पार्ट्या असून काही जणांचे नातेवाईक राजकीय क्षेत्रात आहेत. फरार असलेल्या चार आरोपींपैकी ज्याने सर्वप्रथम पीडित मुलीला वाममार्गाला लावले तो आरोपीही घरचा कोट्यधीश असून सध्या तो अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नात आहे. त्याच्या सोबतच फरार अन्य तीन आरोपीही घरचे गब्बर आहेत.

वासनेची भूक भागवण्यासाठी वाटेल तेवढी किंमत मोजण्यास तयार असलेल्या या धेंडांनी दोन वेळेस अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु जामीन काही मिळाला नाही. या प्रकरणात पांढरपेशा नोकरदार व्यक्तींचा समावेश आहे. परंतु तपासाधिकारी डीवायएसपी सुनील लांजेवार यांनी आरोपींची नावे जाहीर केली नाहीत. तसेच तपासाच्या नावाखाली प्रकरणाची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सामान्य नागरिकाला या प्रकरणातील अटकेतील फरार आरोपींची नावे कळण्यास मार्ग नाही. यामुळे रॅकेटमध्ये गुंतलेल्यांच्या शेजार्‍यांनाही आपल्या शेजार्‍याचे कारनामे कळण्यास मार्ग नाही. आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.