आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hingoli Shivsena Internal Politics News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोलीच्या शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखाची गच्छंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - वसमत येथे 27 जून रोजी संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी लोकसभेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या पराभवाला जबाबदार धरून माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा पुतळा जाळला होता. त्यानंतर डॉ. मुंदडांनी थेट मातोश्रीवर तक्रार केली होती. दोन दिवसांत घडामोडी घडून अखेर सामंत यांच्या जागी विनायक राऊत यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेत माजी खासदार सुभाष वानखेडे विरुद्ध माजी आमदार गजानन घुगे आणि माजी मंत्री डॉ. मुंदडा यांच्यात चालू असलेला वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट असतानाही शिवसेनेचे वानखेडे पराभूत झाले. या पराभवाला गजानन घुगे आणि डॉ. मुंदडा हेच जबाबदार असल्याचा आरोप वानखेडे गट करत आहे, तर पराभवाला स्वत: वानखेडे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आणि सुहास सामंत हेच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप घुगे-मुंदडा करत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या वसमत येथील मेळाव्यात सामंत यांची बैठक झाल्यानंतर डॉ. मुंदडा यांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर मुंदडांनी पक्षनेत्यांकडे तक्रार करून गा-हाणे मांडले होते. त्याचा परिणाम म्हणून सुहास सामंत यांची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली आहे.