आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माळहिवरा येथे पाण्यासाठी मनसेचा रास्ता रोको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले.
माळहिवरा येथे दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावात जिल्हा प्रशासनाने बोअरचे अधिग्रहण केले आहे; परंतु बोअरला पाणी नसून आसपासच्या विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाला टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी सकाळी नऊ वाजता संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होऊन सुमारे दोनशे वाहनांची रांग लागली होती. तहसीलदार राहुल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढली. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.