आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीतील झेडपी सीईओंच्या दालनाचे पीओपी छत कोसळले, देखभालीवर होतो ६० लाखांचा खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या कक्षाचे पीओपीचे छत पूर्णतः कोसळले. सुदैवाने सीईओ कार्यालयात नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी कक्षाची देखभाल करणाऱ्या बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या या इमारतीचे उद्घाटन जून २००८ रोजी झाले होते. त्या दरम्यानच्या काळातच सीईओंच्या दालनासह अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे काम झाले होते. या दालनांसह इमारतीच्या देखभालीवर दर दीड-दोन वर्षांत ५५ ते ६० लाखांवर खर्चही केला जातो. असे असतानाही सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाच्या छताला जोडून बसवण्यात आलेले अॅल्युमिनियम प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत कोसळले.
बांधकाम विभागानुसार, गेल्या वर्षीच्या देखभाल खर्चानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर वॉटर प्रूफिंगवर २२ लाख रुपये खर्च झाले. हे काम करून साधारणतः एक ते सव्वा वर्ष झाले आहे. या वर्षी निधी मिळाला नसल्याने देखभालीचे काम झाले नाही. त्यामुळे दीड ते दोन वर्षांसाठी निव्वळ देखभालीवरच ६० लाखांचा खर्च जिल्हा परिषद करते. असे असतानाही हा प्रकार घडल्याने हा निधी कुठे मुरतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंगोली जि.प. सीईओ मधुकर आर्दड यांच्या कक्षाचे पीओपी छत कोसळले. याची आर्दड यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. छाया: सुधाकर वाढवे