आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांवरून हिंगोली झेडपीची गाजली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शहरातील पीपल्स बँकेजवळ आणि ग्रामीण भागातील अतिक्रमणांवरून सोमवारी झालेली जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक गाजली. शहरातील पीपल्स बँकेच्या मागच्या बाजूला एकाने पंचायत समितीच्या गोदामावर अतिक्रमण केलेले आहे.
याबाबत सर्वोच्च न्यायालये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बाजूने आदेश देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने त्यावर काहीही कारवाई केली नाही. हा मुद्दा आज स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. झेडपी सदस्य गजानन देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. रमजान महिना संपल्यावर हे अतिक्रमण हटवले जाईल, असे आश्वासन बीडीओंनी दिले. शिवसेना, काँग्रेस सदस्यांनीही झेडपी शाळा, इतर जागांवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली बैठकीस झेडपी अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मृती ढेरे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...