आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्री भ्रूणहत्या: डॉक्टरसह पाच जण गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीडमध्ये बिंदुसरा नदीपात्रात फेकून दिलेल्या दोन स्त्री अर्भकांसह तिस-याही कुमारी मातेचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. या स्त्री भ्रूणहत्येचा प्रकार बीडच्या सानप हॉस्पिटलमध्ये घडला असून या प्रकरणी डॉ. शिवाजी सानपसह विवाहितेचा पती, वडील, रुग्णालयातील दोन महिला अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने डॉक्टरसह दोन महिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
परळीतील डॉ. मुंडे दांपत्य गर्भपात प्रकरणात पोलिसांना गुंगारा देऊन फरारी होत असतानाच शनिवारी बीडच्या बिंदुसरा नदीपात्रात स्त्री जातीची दोन अर्भके सापडल्याने राज्यभर खळबळ उडाली. प्रशासकीय यंत्रणेने बीडमध्ये तळ ठोकला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना धारेवर धरले. एवढेच नाही तर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणा-यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले. यामुळे रिक्षाचालक समोर आला आणि त्याने आपण रिक्षांमधून दोन अनोळखी महिलांना बिंदुसरा नदीपर्यंत आणून सोडल्याचे व त्यांनी दोन अर्भके फेकून दिल्याचे सांगितले. त्यानुसार मार्ग काढत पोलिसांनी सानप हॉस्पिटलची तपासणी केली. तेथील दोन महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली.


डॉ. मुंडेसाठी बक्षीस
परळी येथील डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे यांची माहिती देणाºयास औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकांनी 25 हजार, तर पोलिस अधीक्षकांनी 15 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे. बीडमधील अर्भक प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

रॅकेट उद्ध्वस्त करा
सामाजिक संघटना, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे. स्त्री भू्रूणहत्येचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करावे. दुरुस्ती करून कायदा कठोर करावा. व स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे.’’
गोपीनाथ मुंडे, खासदार
गर्भपात करताना बीडमध्‍ये महिलेचा मृत्‍यू, \'लेक लाडकी\' अभियानाचा फज्‍जा
स्‍त्री भ्रूणहत्‍याः उत्तर प्रदेशच्‍या न्‍यायालयाकडून एकाला फाशीची शिक्षा