आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना हक्काच्या घरासाठी बँकेच्या कर्जाचा पर्याय; महामंडळाकडे निधीची कमतरता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्थिर आयुष्य जगता यावे यासाठी पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून घर बांधणीसाठी कर्ज दिले जाते. परंतु महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याने आता सरळ बँकेकडून कर्ज घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांना ते उपलब्ध करून देण्याचा पर्याय गृह विभागाने स्वीकारला असल्याने आता मागेल त्याला घर बांधणीसाठी कर्ज मिळणार आहे. 
 
राज्यातील पोलिस दलाचे संख्याबळ सुमारे २ लाख २० हजार इतके असून त्यात नियमित वाढही होत आहे. शिपाई, सहायक पोलिस निरीक्षक, हवालदार, नाईक यांची एकूण संख्या सुमारे १ लाख ९१ हजार २६ इतकी असून त्याचे एकूण दलातील कर्मचारी यांची तुलना करता ९२% इतके प्रमाण आहे. तसेच उपनिरीक्षकांची संख्या ७ हजार ७६७ इतकी असून निरीक्षक जवळपास ३ हजार आहेत. कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होत असले तरी शासकीय निवासस्थान सेवानिवृत्तीनंतर सोडावे लागते. त्यामुळे स्वत:चे घर बांधून घेण्यासाठी हे कर्मचारी इच्छुक असतात. त्यासाठी शासनाने घरबांधणी अग्रिम योजना सुरू केली आहे. या योजनेत वेतनाच्या २०० पट मर्यादेत घर बांधणी अग्रिम उपलब्ध करून देण्यात येते. परंतु गेल्या ४ वर्षांच्या कालावधीत घर बांधणीसाठीचे सुमारे ७६०० अर्ज पोलिस महासंचालक कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. 
बातम्या आणखी आहेत...