आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होमिओपॅथी महाविद्यालयात गतिमंदांच्या पंखात बळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जन्मत:च मतिमंद असल्याने व्यंगच नव्हे तर शारीरिक व्याधीने आयुष्याची गती गमावलेल्या रुग्णांच्या पंखात बळ भरून त्यांच्या आयुष्याची गती वाढवण्याचे काम चार वर्षांपासून शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाने केले आहे.
प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथीचे मोफत शिबिर घेत आतापर्यंत 8 हजार रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यामुळे आले आहेत. रविवारी झालेल्या शिबिरात 570 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गर्भावस्थेत असताना योग्य पोषण न मिळाल्याने गतिमंद व मतिमंद आजार होतो. मेंदूची पूर्ण वाढ न झाल्याने शरीरावर नियंत्रण राहत नाही. अनेकांना बोलता येत नाही, चालता येत नाही, आकलन क्षमता कमी होते, असे रुग्ण सांभाळने कुटुंबीयांसाठीही एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसते. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची अशा कुटुंबीयांची तयारी असते. या रुग्णांना प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथी फायद्याची ठरत असल्याने शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांच्या पुढाकारातून मुंबईचे तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचे चार वर्षांपासून प्रत्येक तीन महिन्याला तपासणी शिबिर घेण्यात येते.
40 डॉक्टरांची टीम
रुग्णांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक तीन महिन्याला होणार्‍या शिबिरात 40 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुंबईतून येते व रुग्णांची तपासणी करते. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी यासाठी मदत करतात. तपासणी व औषधोपचारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

सामाजिक जाणिवेतून उपक्रम
गतिमंद व मतिमंद रुग्णांच्या समस्या मोठ्या आहेत. अशा रुग्णांची काळजी घेताना कुटुंबीयांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
डॉ. अरुण भस्मे, प्राचार्य एस. के. एच. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय