आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून खून; बाप-लेक ताब्यात, मांजरसुंबा घाटात तरुणाचा ठेचून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - साळिंबा येथील राधा प्रल्हाद बिटे या अल्पवयीन मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केल्याप्रकरणी वडवणी पोलिसांनी तिच्या वडिलांसह भावाला ताब्यात घेतले आहे.
१९ डिसेंबर रोजी राधा (१६) गावातील तरुणाबरोबर चित्रपट पाहण्यासाठी बीड येथे गेली होती. चित्रपटगृहातून बाहेर निघाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या सांगण्यावरून बीडच्या महिला गस्तपथकाने या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर ठाण्यात आणले. वडवणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यांनर रात्री अाठ वाजता राधाचा मृतदेह तिच्या दारात अाढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. आपल्या घराची अब्रू गेली म्हणून घरातील मंडळींनी तिचा खून केल्याचा संशय आहे.

पुढील स्लाइडमध्ये, मांजरसुंबा घाटात तरुणाचा ठेचून खून