आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑनर किलिंग’ला पायबंद आवश्यक : पुष्पाताई भावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - खूप वर्षांपासून आपण जातीच्या कुंपणात जगत आल्याने जातीपातीच्या भिंती घट्ट झाल्या होत्या, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे ही ओळख पुसली जात आहे. मात्र, अमेरिका, लंडन, पाकिस्तान आणि भारतातही खोट्या प्रतिष्ठेसाठी ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार घडत असल्याने आंतरजातीय विवाहासाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत पुष्पाताई भावे यांनी येथे व्यक्तकेले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित ‘जोडीदाराची योग्य निवड’ (संदर्भ-आंतरजातीय/धर्मीय सत्यशोधकी विवाह) राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेत अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. जातीबाहेर विवाह म्हणजे कलंक असल्याचा समज बळावल्याचही त्यांनी स्पष्ट केले.

सत्यशोधकी विवाह
सातारा येथील यतीन अनगळ व पूजा कळसकर आणि महेश कदम (जळकोट, ता. तुळजापूर) व सोनम साळुंके (जळगाव) ही जोडपी विवाहबद्ध झाली. अंनिसच्या वतीने सत्यशोधक पद्धतीने लावण्यात आलेला हा 123 वा विवाह ठरला.

यापुढे आरक्षण नको - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर फक्तदहा वर्षे आरक्षण द्यावे, असे सांगितले होते, परंतु राजकारणी त्याला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे यापुढे तरी नव्याने आरक्षण देण्यात येऊ नये.’’ - पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ समाजवादी