आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांसाठी जवळा येथे सभागृह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम- विदर्भातून अनेक पालख्या पंढरपूरकडे भूम मार्गाने पायी जातात. प्रत्येक पालखीचा ठराविक ठिकाणी दरवर्षी मुक्काम केला जातो. त्याअनुषंगाने जवळा येथील विठ्ठल मंदिराच्या खुल्या जागेत ग्रामपंचायतमार्फत मोठे सभागृह बांधले जात आहे. प्रत्येक पालखीसाठी हे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे भाविकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

तिंत्रज, दांडेगाव, वाकवड, कुंथलगिरी, आरसोली, देवळाली, जवळा (नि.) मार्गाने संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज या मोठ्या पालख्यांसह अनेक पालख्या विदर्भातून या मार्गाने पायी जातात. ठिकठिकाणी या पालखीचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले जाते. इच्छेनुसार वारकरी बांधवांची जेवणाची, स्नानाची, निवासाची सोय केली जाते. संत मुक्ताबाईंच्या पालखीचे शनिवारी (दि.१८) तालुक्यात आगमन होत आहे. रविवारी (दि.१९) जवळा (नि.) येथे पालखीचा मुक्काम होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जवळा येथे या पालखीच्या मुक्कामाची सोय जिल्हा परिषद शाळा, लहानशा विठ्ठल मंदिरासह इतरत्र अनेक ठिकाणी केली जात होती. पालखीतील वारकरी बांधवांची संख्या पाहता अनेक ठिकाणी मुक्कामाची सोय केली जात असल्याने त्यांना अनेक गौरसोयींना सामोरे जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी जवळा ग्रामपंचायतीने विठ्ठल मंदिराच्या खुल्या जागेत ३६ बाय १२५ फूट जागेत सभागृहासारखा हॉल तयार करण्यात येत आहे. मुक्ताबाईंच्या पालखीतील वारकऱ्यांची येथेच सोय व्हावी यादृष्टीने तब्बल ९ लाख रुपये खर्चाचे हे काम करण्यात येत आहे. येथेच वारकऱ्यांची निवास, भोजन, स्नान, चहापाण्याची सोय केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...