आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा पेपर पुन्हा फुटला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत शनिवारी पुन्हा प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, विभागीय शिक्षण मंडळाने पेपरफुटीची बाब फेटाळून लावत नेमका प्रकार काय हे पाहण्यासाठी संबंधित केंद्रावर एका अधिकाऱ्याला पाठवल्याचे विभागीय सचिव डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.   

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर दुपारच्या सत्रात तीन ते सहा या वेळेत राज्यशास्त्र विषयाची परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षार्थींना कॉपी पुरवण्यासाठी पालक, नातलगांची गर्दी झाली होती. त्याच वेळी काहींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही फुटलेली प्रश्नपत्रिका फिरू लागली.
 
विभागीय सचिव मोरे यांच्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केंद्रावर जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु त्यांनी पेपर फुटल्याची बाब नाकारली आहे.  बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील शिवनी येथील शामगीर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर इंग्रजीचा पेपर फोडून खुलेआम कॉपी झाली होती. त्या वेळी तत्काळ केंद्र संचालकाला हटवण्यात आले होते.  
बातम्या आणखी आहेत...