आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर 12 वीचे पेपर फुटण्याची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात घेणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (दि. २८) सुरुवात झाली आहे. राज्यभर शिक्षण विभाग कॉपीमुक्ती अभियान राबवत असले तरी परीक्षा केंद्रांवर मोबाइलच्या वापरामुळे पेपर लीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रांवर मोबाइल बंदीसह सीसीटीव्ही बसवण्याची नितांत गरज आहे.
 
मंगळवारी बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली तर पुढील आठवड्यात दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. सध्या विविध परीक्षा केंद्रांवर पेपर लीक होण्याचे प्रकार वाढल्याच्या बातम्या वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकत आहेत. कॉपीमुक्ती अभियानामुळे मित्र व नातेवाइकांकडून परीक्षा केंद्रांवर बाहेरून कॉपी देण्याच्या परंपरेला आता आळा बसला आहे. ग्रामीण भागातही कारवाईच्या धास्तीने परीक्षा केंद्राच्या आवारात एकही जण फिरकताना दिसत नाही. मात्र, कॉपी करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरात असल्याच्या शंका निर्माण झाल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर व कक्षात सीसीटीव्ही लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे.  

कॉपीमुक्ती अभियानाला सुरुंग 
परीक्षा केंद्रांवर मोबाइल वापरास सक्त बंदी असली तरी सर्रासपणे मोबाइल केंद्रात नेले जातात. त्यामुळे व्हाॅट्सअॅपवर काही मिनिटांतच पूर्ण पेपर बाहेर पडतो. हा फंडा वापरून कॉपीमुक्ती अभियानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सीसीटीव्हीची गरज...!  
परीक्षा केंद्रांवर भरारी पथकासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो. मात्र, छुप्या मार्गाने कॉपीबहाद्दरांपर्यंत त्यांची नजर पोहोचत नाही. निदान परीक्षा काळात केंद्रांवर सीसीटीव्ही बसवल्यास कॉपी करण्यावर नक्कीच आळा बसेल.
बातम्या आणखी आहेत...