आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत थरार:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पत्नीच्याचारित्र्यावर संशय घेत किरकोळ भांडणातून पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी जायकवाडी धरण परिसरात घडली. याप्रकरणी पैठण पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. सुनीता जालिंदर कुचे (३०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

जालिंदर कुचे (३५) याचा विवाह दहा वर्षांपूर्वी सुनीताशी झाला होता. मात्र, काही वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यासंदर्भात संशय घेत होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. मंगळवारी सकाळी जालिंदर हे पत्नीसह जायकवाडी धरणालगत असलेल्या शेतात गेले. यादरम्यान त्या पती-पत्नीत वाद झाला. यात रागाच्या भरात जालिंदरने सुनीताच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात ती जागीच कोसळून मृत्युमुखी पडली. पत्नी मरण पावल्याचे लक्षात येताच जालिंदरने सरळ पैठण पोलिस ठाणे गाठले.

त्या ठिकाणी उपस्थित पाेलिस कर्मचाऱ्यांना मी पत्नीचा खून केल्याचे सांगितले; परंतु त्यांच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. काही वेळाने पोलिसांनी वस्तुस्थिती पाहण्यासाठी घटनास्थळी आपला मोर्चा वळवला. घटनास्थळी पोहोचताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जालिंदरविरुद्ध गुन्हा नोंदवत अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पैठण पोलिस करत आहेत.