आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यातून पत्नीला मारहाण करून कारागीर पतीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- सततच्या अपयशाने नैराश्य आलेल्या शहरातील एका कारागिराने पत्नीला मारहाण करून स्वत: मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.१०) मध्यरात्रीनंतर घडली असून मारहाणीत बेशुद्ध झालेल्या पत्नीला सकाळी शुद्ध आल्यावर घडला प्रकार समोर आला.  
 
देवन्नाथ उत्रेश्वर सुतार (३२) हा तांबरी विभाग येथे मोहिते यांच्या घरात पत्नी विद्या व दोन मुलांसह किरायाने राहण्यास होता. तो सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होता. आर्थिक चणचणीतून घरात पत्नीबरोबर त्याचा सतत वाद होत होता. मागील दोन ते तीन दिवसांपासूनही पती-पत्नीत वाद होत होता. यामुळे पत्नी विद्या यांनी दोन दिवसांपासून जेवणही केले नसल्याचे कळते. त्यातच गुरुवारी रात्री दोघांत वाद झाला. या वेळी रागाच्या भरात देवन्नाथ सुतार यांनी पत्नी विद्या हिला मारहाण केली. चाकूनेही मारले यामध्ये त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर देवन्नाथ यांनी स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास विद्या या शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने घरमालक दादासाहेब मोहिते यांना बोलावून ही माहिती दिली. 

मला माफ करा..तुम्हाला सांभाळू शकलो नाही: आत्महत्या करण्यापूर्वी देवन्नाथ सुतार यांच्या जवळून एक पत्र मिळाले आहे. पत्रामध्ये त्यांनी “”आई मला माफ कर, मी तुला सांभाळू शकलो नाही, मला गेल्या अनेक वर्षांपासून कामामध्ये अपयश येत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड आहे. सासू-सासऱ्यांवरही हात उचलला, पत्नी, मुलांनाही समाधानी ठेवू शकत नाही, मला माफ करा, मी स्वत:चा शेवट करत आहे’ असा मजकूर लिहिलेला आहे.
बातम्या आणखी आहेत...