आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर, रागाच्‍या भरात चाकुने केले वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - येथील नगर परिषद वसाहतीत शनिवारी दुपारी १ च्या सुमारास लोखंडी रॉड आणि चाकूचे वार करून पत्नीचा खून करून आरोपी पती पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला परत घरी नेऊन पाहणी केली असता, त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली आढळली. परवीन बेगम शेख सलीम (४७) असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पती  शेख सलीम शेख इस्माईल (५२) यास अटक केली.   
 
फौजदार तानाजी चेरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सलीम याचे बसस्थानकासमोर चहाचे दुकान आहे. दुपारी एकच्या सुमारास पत्नीचा खून करून तो तासाभराने पोलिसांत हजर झाला. त्याने घडलेली घटना पोलिसांना कथन केली. पोलिस निरीक्षक उदयसिंग चंदेल, फौजदार तानाजी चेरले यांनी त्याला  नगर परिषद वसाहत भागात घटनास्थळी नेले असता परवीन बेगम रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली.    
 
घरगुती वादातून केला खून : गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नीत वाद होत होता. शनिवारीही दोघांत वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपी शेख सलीम याने घरातील चाकू आणि लोखंडी रॉडने पत्नीवर सपासप वार केले. गळा, पोटावर लागलेल्या गंभीर वारांमुळे परवीन बेगम जागीच गतप्राण झाली.
बातम्या आणखी आहेत...