आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालाला हमीभाव द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची मी हमी देतो; उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असे हे सरकार सांगत आहे. अरे, माफी आरोपींना देतात, शेतकरी आरोपी आहेत काय, असा सवाल शेतमालाला हमीभाव द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची मी हमी देतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. कर्जमाफीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मराठवाड्यात गुरुवारी नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्याचा दौरा केला. 

शेतकऱ्यांशी संवाद साधून जाहीर सभांतून मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सडकून टीका केली. वसमत येथे ते म्हणाले, केवळ शिवसेनेच्या रेट्यामुळेच कर्जमाफी शक्य झाली आहे. बुद्धिवादी विचारतात की, तुमची नेमकी भूमिका काय? सत्तेत आहात, तुमचे मंत्री आहेत तरी सरकारविरुद्ध शेतकऱ्यांसोबत आहात. यावर नेहमी सांगत होतो ते आज मी करून दाखवलं. आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, शिवसेना तुमची आहे. तुमच्यासाठी आहे, असे ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठीही प्रचंड आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधी पक्षांच्या सुरात सूर मिळवून शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता कर्जमाफीनंतरही त्यांनी ही भूमिका सोडलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...