आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असदुद्दीन ओवेसी म्‍हणाले- मानेवर सूरी ठेवा तरी \'भारत माता की जय\' म्हणणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-इत्तेहादुल-मुसलमिन) या पक्षाचे अध्‍यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वादग्रस्‍त विधान केले आहे. ते म्‍हणाले- हवं तर माझ्या मानेवर सूरी ठेवा, पण मी "भारत माता की जय' म्‍हणणार नाही. लातूरच्या उद्गीरमधल्या सभेत रविवारी ओवेसी यांनी असे विधान केले आहे. या भाषणाचा व्‍हिडीओ सोमवारी समोर आला. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याला ओवेसींनी उत्‍तर दिल्‍याचे बोलले जात आहे. काय म्‍हणाले होते भागवत..
- सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या विधानावर ओवेसी यांनी उत्‍तर दिले आहे.
- भागवत म्‍हणाले होते, आज "भारत माता की जय' म्‍हणायला शिकवण्‍याची वेळ आली.
- जेएनयूमध्‍ये देशविरोधी नारेबाजी करणा-यांना उद्देशून भागवत असे बोलले होते.
- ओवेसी म्‍हणाले, संविधानात असे कुठेही नाही की, "भारत माता की जय' म्‍हणने गरजेचे आहे.
- आपले संविधान मला परवानगी देते की, मला जबरदस्‍ती कुणीही "भारत माता की जय' असे बोलण्‍यास भाग पाडू शकत नाही, असे वक्‍तव्‍यही ओवेसी यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र सरकारने म्‍हटले- या विधानाची तपासणी होईल..
- ओवेसी यांच्‍या या विधानानंतर राजकारण तापू लागले आहे.
- भाजप आणि शिवसेना यांनी चौकशीची मागणी केली आहे.
- सुधीर मुंगटीवार म्‍हणाले, ओवेसी यांना सदबुद्धी मिळो ही आमची प्रार्थना आहे.
- मुंगटीवार यांनी स्‍थानिक प्रशासनाला वादग्रस्‍त वक्‍तव्‍याची चौकशी करण्‍याचे सांगितले आहे.
- ते म्‍हणाले की, संभाषण स्वातंत्र्याच्‍या नावावर असे कोणतेही वक्‍तव्‍य करता येत नाही.
- शिवसेनेच्‍या नेत्‍यांनीही चौकशी करून कारवाई करण्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, काय म्‍हणाले होते भागवत..
शेवटी पाहा, ओवेसी यांच्‍या वक्‍तव्‍याचा व्‍हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...