आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ideal Project For Violence Against Woman, Woman Commission\'s Jyotsna Visapute Inform

अत्याचार रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवणार,महिला आयोगाच्या ज्योत्स्ना विसपुते यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महिला अत्याचारात राज्यात बीड जिल्हा गाजत असून हा प्रकार चिंताजनक आहे. यास आळा घालण्यासाठी समाजाच्या सहभागातून चळवळ उभारण्याची गरज आहे. यासाठी राज्य महिला आयोग जिल्ह्यात राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या ज्योत्स्ना विसपुते यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली.
माजलगाव शहरातील फुलेनगर येथे बुधवारी सासरच्या मंडळींनी सुनेला मुलगी झाल्याने तिला पेटवून दिले होते. गंभीर भाजलेल्या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार समाजल्यानंतर ज्योत्स्ना विसपुते त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीडला आल्या. दुपारी त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन झरिना खान हिची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, जिल्हा आधीच स्त्री भ्रूणहत्येत बदनाम आहे, महिला अत्याचारातही वाढ होत आहे. ही गोष्ट चिंताजनक असून महिलांबरोबरच पुरुषांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे. कारण गुन्हा हा पुरुषांकडून घडतो. बीडमध्ये असे अत्याचार रोखण्याकरिता जाणीवजागृतीसाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेणार असून महाराष्ट्रात आयोगाकडून राबवला जाणारा हा पहिलाच प्रकल्प असेल. या वेळी त्यांच्यासमवेत दिलीप भोसले, कुं दा काळे, अ‍ॅड. संगीता धसे आदी उपस्थित होते.
17 महिन्यांत 170 बलात्कार
जिल्ह्यात मागील 17 महिन्यांत 170 बलात्कार व 250 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. विशेष म्हणजे जळीत प्रकरणांची माहिती पोलिसांकडेच नसल्याची गंभीर बाबही त्यांनी सांगितली.