आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal 80 Lack Money Recovered From Shobha Raut, Divya Marathi

लाचखोरीतील शोभा राऊतकडे ८० लाखांची बेहिशेबी मालमत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कौडगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादित जमिनीतील फळझाडांच्या मावेजापोटी धनादेशासाठी लाच घेताना उस्मानाबादच्या उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी शोभा राऊत यांना दोन महिन्यांपूर्वी पकडण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत त्यांच्याकडे ८० लाख ३८ हजार ५७७ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणीही त्यांच्याविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादित जमिनीवरील फळझाडांच्या मावेजापोटी शेतक-यांना देण्यासाठी शासनाकडून रक्कम आलेली होती; परंतु रकमेचे धनादेश देण्यासाठी शोभा राऊत यांना १६ जुलै रोजी ३९ हजार २०० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांच्या उस्मानाबाद व परभणी येथील राहत्या घरी छापे मारले होते. या वेळी ९५ लाख ६ हजार ५७७ रुपयांची मालमत्ता मिळून आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी तपास केला. या वेळी मिळालेल्या रकमेपैकी ८० लाख ३८ हजार ५७७ रुपयांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे आढळून आले. त्यानुसार शोभा राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.