आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूरच्या नगरसेवकाच्या गाडीत सापडले 35 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई मुख्यालयातून काढलेली धारूर शाखेची 35 लाखांची रक्कम धारूरचे नगरसेवक बाळू चव्हाण यांच्या गाडीत आढळली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.

पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी चनई येथे गाडीचा पाठलाग करून गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता ही गाडी पकडली. गाडीची तपासणी केली असता 35 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.

जिल्हा मजूर संस्था व शासन अनुदान असे 35 लाख रुपये स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंबाजोगाई शाखेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नेण्यात आले. तिथून पुढे सहा मजूर संस्थांच्या देयकांची रक्कम व शासनाच्या अनुदानाची 35 लाखांची रोकड (क्रमांक एम.एच. 44 जी. 0627) कारमधून नेण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.