आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडाच्या घरातही शौचालय बांधून मांडला अादर्श; भूम तालुक्यात 91 टक्के कामे पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम- तालुक्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत चार महिन्यांपासून भूम पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाद्वारे  शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करून तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला प्रतिसादही चांगला मिळत असून 
भवानवाडी येथील पारधी समाजाच्या वस्तीवर एका वृद्धाने कुडाचे घर असताना शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.    

भूम तालुक्यात आतापर्यंत ९१ टक्के शौचालयांची कामे पूर्ण केली आहेत. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या २६२६ लोटाप्रेमींकडून ७ लाख ३२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. यावरून शौचालयाबाबतची नागरिकांमधील अनास्था दिसून येते. अशाही परिस्थितीत स्वच्छतेपासून दोन हात लांब असणाऱ्या भवानवाडी येथील पारधी जमातीतील कुडाच्या छपरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील शाबू विष्णू भोसले या वृद्ध व्यक्तीने स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन शौचालय बांधून व त्याचा नियमित वापर करून संपूर्ण तालुक्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. उदरनिर्वाहासाठी सतत फिरस्ती राहणारा हा समाज. भोसले कुटुंबाला राहण्यासाठी पक्के घर नसतानाही त्यांनी अतिशय सुंदर असे शौचालय बांधून त्याचा सर्व कुटुंबाने वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याबद्दल पंचायत समिती गटविकास अधिकारी राजू  कांबळे, विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे, व्ही. व्ही. बाविकर, ग्रामसेवक ए. जी. कातखेडे यांनी भोसले यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करत त्यांचे कौतुक केले.    
बातम्या आणखी आहेत...