आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incident In Beed, 85 Years Old Salgadi Stranded In Borewell

बीडमधील घटना, 85 वर्षीय सालगडी बोअरमध्ये अडकला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी - चारशे फूट खोल बोअरमध्ये 45 फूट खोलीवर 85 वर्षीय सालगडी अडकून पडल्याची घटना वडवणीजवळील कुप्पा येथे बुधवारी घडली. माणिकराव वानगडे असे या वृद्धाचे नाव असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा आवाज येत होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


राजेभाऊ काळे यांच्या शेतात दुपारी म्हशीला चारा टाकून बोअरवरील कुपाट्या व टोपले काढण्यासाठी माणिकराव गेले. तोल गेल्याने ते बोअरमध्ये पडले. जवळच्या शेतातील मजुरांनी बोअरमध्ये दोर टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. काळे यांनी तहसीलदारांना हा प्रकार कळवला. जेसीबी, पोकलेनच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. त्यानंतर आणखी एक पोकलेन मागवण्यात आले. बोअरमध्ये नळीद्वारे प्राणवायू सोडण्यात आला आहे. आटल्यामुळे बंद बोअरचा केसिंग पाइप काढण्यात आला होता. त्यावर कुपाट्या व टोपले ठेवले होते. ते लक्षात न आल्याने माणिकराव बोअरमध्ये पडले.