आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात प्राप्तिकर विभागाचे 30 ठिकाणी छापे; दुसर्‍या दिवशीही चौकशी सुरुच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- इनकम टॅक्स विभागाच्या वतीने मंगळवारी शहरात 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईने शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. वेगवेगळ्या पथकांनी सकाळी सुरू केलेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आज, बुधवारी दुसर्‍या दिवशीही चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.    
 
मिळालेली माहिती अशी की, इनकम टॅक्स विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाने मंगळवारी शहरात एकाच वेळी 30 ठिकाणी छापे टाकले. यात प्रामुख्याने ऑइल मिल आणि बाजार समितीतील काही व्यापारी संस्थानांचा समावेश होता. 7 सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्ट कारखान्यांच्या 18 ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. बाजार समितीतील 12 व्यापाऱ्यांच्या संस्थानांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेगवेगळ्या पथकांनी हे छापे टाकल्याने रात्री उशिरापर्यंत सर्व माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू होते. दुसर्‍या दिवशीही ‍‍अधिकारी चौकशी करत आहेत. जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

पुढील स्लाइडवर वाचा, कारवाईचा सविस्तर तपशील सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...