आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Jain Organization Set Up Fodder Comp Over The Six District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा जिल्ह्यांत छावण्यांसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आपत्तीच्या काळात शासनाच्या मदतीविना समाजधुरिणांना सोबत घेऊन समाजोपयोगी कार्य करणा-या भारतीय जैन संघटनेने यंदा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात दिला आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर तसेच शेजारच्या सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये शासनाच्या मदतीविना बत्तीस छावण्या सुरू करून त्यात सुमारे साडेसोळा हजारांवर जनावरांची भूक भागवण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पारख यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. यातील काही छावण्या सुरू झाल्या असून, येत्या सात एप्रिलपर्यंत सर्व छावण्या सुरू होतील, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील 15 जिल्हे यंदा दुष्काळाच्या छायेखाली आहेत. चाळीस वर्षांत एवढी खराब स्थिती अनुभवली नव्हती, अशा स्थितीचा लोक सामना करत आहेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे पुढाकार घेत 26 फेब्रुवारीला बैठकही बोलावली. संघटनेचे

राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पशुधन जगवण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तर लगतच्या सोलापूर या सहा जिल्ह्यांमधील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी मदतकार्य सुरू करण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर प्रफुल्ल पारख यांनी या सहा जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. छावण्यांसाठीचे नियोजन, जागा यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यालय सुरू केले. या बरोबरच व्यवस्थेसाठी टास्क फोर्स स्थापन केले. या कार्यात चार महिने जनावरांचे
संगोपन करताना निवारा, चारा, पाण्याची सोय यासोबतच ज्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे तेथे पाणी व पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या देण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिका-यांच्या बैठकीत झाला. बीड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये छावण्यांना सुरुवातही झाली आहे. उर्वरित छावण्या सात एप्रिलपूर्वी सुरू होणार असल्याचे प्रफुल्ल पारख यांनी सांगितले.

चारा-पाण्यासह जनावरांच्या आरोग्याचीही काळजी छावणीत दाखल झालेल्या जनावरांची तहान, भूक भागवतानाच त्यांच्या आरोग्याची काळजीही संघटनेच्या वतीने घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सुमारे 350 पांजरपोळ संस्थांच्या विश्वस्तांची बैठक 24 मार्च रोजी पुण्यात झाली. छावण्यातील जनावरांच्या आरोग्यासाठी पांजरपोळमध्ये कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिका-यांच्या पाच जणांची समिती एक स्थापन करण्यात आली आहे. त्यांची पथके चारा छावण्यांना भेटी देऊन जनावरांची तपासणी करतील. याबरोबरच योग्य औषधोपचार करणार आहेत.
जालन्यात दहा हजार पशुधन माटुंगा येथील जैन मंदिर संघातर्फे जालना येथे दहा हजार जनावरांची एक छावणी सुरू करण्यात येणार आहे. या छावण्यांमध्ये मालकांच्या निवासाची सोय करण्यात येईल. जैन समाज 200 वर्षांपासून गोपालन करत आहे.’’ प्रफुल्ल पारख, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जैन संघटना

शासनाच्या मदतीविना खर्चाचे नियोजन
20,00,000 रुपये अपेक्षित 200 जनावरांच्या एका छावणीसाठी
1,00,000 रुपये, एक ट्रक चारा, पशुखाद्य छावणीत पोहोचण्यास
15,000 रुपये पाच हजार लिटरच्या एका टाकीसाठी
50,000 रुपये एका गावात महिनाभर एक टँकर पाणी पुरवठ्याला
2,00,000 रुपये एका गावात रोज चार महिने टँकरने पाणीपुरवठा