आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीच्या वायुमंडळात तीन नवीन बॅक्टेरिया : डॉ. जयंत नारळीकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - पृथ्वीच्या वायुमंडळात येथे कधीही न आढळलेले तीन बॅक्टेरिया सापडले आहेत. इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही याबाबत अद्याप कोठूनही सकारात्मक संदेश िमळालेला नाही, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांनी मंगळवारी येथे व्याख्यानात दिली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ प्रांगणात आयोजित विश्वात आपण एकटेच आहोत का? या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध सुरु आहे. परंतु आम्ही भारतात पृथ्वीच्या वायुमंडळात जवळपास ४०-५० किलोमीटरच्या अंतरावर हवेचे नमुने घेऊन त्यात काही जीवसृष्टीचे पुरावे आढळतात का याचा अभ्यास करीत आहोत. हा अभ्यास सुुरु असणारा भारत हा एकमात्र देश आहे. आतापर्यंत यासंबंधात हैदराबाद येथून गँसच्या फुग्याद्वारे उपकरणं पाठवून दोन प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात जीवंत सेल्स, बॅक्टेरिया, फंगस आढळले. यातील तीन बॅक्टेरिया वेगळ्या प्रकारचे आढळले. ते पृथ्वीवर आढळणारे नाहीत. पृथ्वीवरील बॅक्टेरिया अल्ट्रा व्हायोलेट किरणात मरुन जातात. नवीन बॅक्टेरिया त्यातही जीवंत राहतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना हॉवेल, आर्यभट्ट व इस्त्रोची नावे दिली. हे बॅक्टेरिया कोठून आले याचा शोध सुरू आहे.

मानवी क्षमतेला मर्यादा
माणसाला चंद्रावर पोहोचण्यास यानाच्या सहाय्याने दोन दिवस लागतात. प्रकाशाचे किरण मात्र सव्वा सेकंदात पोहोचते. त्या हिशोबाने आपल्या आकाशगंगेच्या जवळपासच्या ग्रहावर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर माणसाला ग्रहावर पोहोचण्यास ५० हजार वर्ष लागतील. परत येण्यास एक लाख वर्ष लागेल. त्याला डीफ्रीज करुन पाठवायचे ठरविले तरी तो परत आल्यानंतर येथे सगळेच बदलेले असेल. त्यामुळे आता रेडियो किरणांच्या द्वारेच इतरत्र सांकेतिक संदेश पाठवून उत्तराची वाट पाहत बसणे एवढेच आपल्या हाती आहे. यापूर्वी असे संदेश पाठविण्यात आले. अजून एकाही संदेशाचे उत्तर आले नाही. सर्वात जवळच्या ग्रहाजवळून उत्तर येण्यास साडेआठ वर्षाचा कालावधी लागतो. आकाशगंगेत शंभर अब्ज तारे आहेत. त्या ताऱ्याभोवती ग्रहही आहेत. ज्या रेणूतून जीवसृष्टी निर्माण होऊ शकते अशा रेणूचे ढगही आकाशात सापडले आहेत. त्यामुळे आता पृथ्वीवरील जीवसृष्टी अशा रेणूतून निर्माण झाली काय यावर आता संशोधन सुरु अाहे.
बातम्या आणखी आहेत...