आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रधनुष्य युवक महोत्सव खुलला; तरुणाईने उधळले कलेचे सप्तरंग; 10 विद्यापीठांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवक महोत्सवाच्या उद‌्घाटनप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी  विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले.  दुसऱ्या युवकाच्या हातातील मंकी बात हे फलक लक्ष वेधून घेत होते.  छाया : योगेश गौतम - Divya Marathi
युवक महोत्सवाच्या उद‌्घाटनप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. दुसऱ्या युवकाच्या हातातील मंकी बात हे फलक लक्ष वेधून घेत होते. छाया : योगेश गौतम
परभणी - राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्याची गरज असून इंद्रधनुष्यसारखे युवक महोत्सव त्यांच्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. 
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी घडत असतो, त्यांच्या सांस्कृतिक कला गुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी रविवारी (दि.पाच) येथे केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १५ वा  राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव “इंद्रधनुष्य’ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसिध्द कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू होते तर विद्यापीठ कार्यकारणी सदस्य डॉ.पी.आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, स्पर्धा निरीक्षक डॉ. आनंद पाटील, डॉ. अजय देशमुख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ. अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक  विनोद गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रा.भालेराव म्हणाले की, समाजात कलावंत हा सर्वात मोठा असतो. श्रीमंत, अधिकारी किंवा राजा यापेक्षा लोक कलावंतांना लक्षात ठेवतात. कलावंतांनी आपल्या कलागुणांचा वापर लोक, समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी करावा. नवा युगाचा नवा शिवाजी तुमच्यामधून घडवावा, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केली. 

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू  डॉ. बी. व्यंकटेश्वरलू म्हणाले की, आजच्या माहिती तंत्रज्ञान व मोबाईलच्या युगात खरी कला व संस्कृती लयास जाण्याची भीती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये कला व संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.  युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी पारितोषकासाठी सहभाग न घेता, बेभान होऊन कला सादर करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

स्वागतपर भाषण शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी केले तर प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आशा आर्या  व डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार प्राचार्या डॉ. हेमांगिणी सरंबेकर यांनी मानले.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते युवक महोत्सवाच्या ध्वजाचे रोहण करण्यात आले.  
 
२४ कलाप्रकारांचे सादरीकरण  
पाचदिवसीय युवक महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय व ललित कला अशा विभागांतील विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेत. महोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्त्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध कला प्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील. राज्यातील १९ कृषी व अकृषी विद्यापीठातील सुमारे ७१४ स्पर्धक विद्यार्थी, विद्यार्थिनी,  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा निरीक्षक सहभागी आले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...