आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: मुख्यमंत्र्यांसाठी पाडलेल्या भिंतीमुळे स्टेडियममध्ये खासगी वाहनांची पार्किंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबादेत श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये खासगी वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. - Divya Marathi
उस्मानाबादेत श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये खासगी वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे.
उस्मानाबाद - शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर नुकत्याच आयोजित ९७ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटनाला मुख्यमंत्री येणार होते. त्यांच्या व्हीआयपी प्रवेशासाठी जिल्हा स्टेडियमची एका कोपऱ्यातील मोठी भिंत पाडण्यात आल्यामुळे आता खासगी वाहनधारकांनी स्टेडियममध्ये वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी भिंतीच्या आतील कोपऱ्याचा लघुशंकेसाठी वापर सुरू केला आहे. याचा स्टेडियममध्ये नियमित खेळाडू फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.
 
उस्मानाबाद शहरात दि.२१ ते २३ एप्रिलदरम्यान ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडले. या सोहळ्यात कोणतीही उणीव राहू नये याची दक्षता संयोजक तसेच प्रशासनानेही घेतली होती. संमेलनाच्या उद्‌घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्रीही येणार होते.
 
स्टेडियमला दोन प्रवेशद्वार असून त्यातील एकाचा व्हीआयपींसाठी वापर करता येत असतानाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडील बाजूची जवळपास ७० ते ८० फूट लांब १८ ते २० फूट उंच भिंत जमिनीपासून पाडण्यात आली. विशेष म्हणजे एक चारचाकी वाहन येण्यासाठी दहा फुटांची जागा पुरेशी आहे. मुख्यमंत्री येणार आहेत म्हटल्यावर व्हीआयपी ताफ्यासाठी जागा दुपटीने लागणार होती. परंतु, यासाठी एका कोपऱ्यातील संपूर्ण भिंतच पाडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भिंत काढण्यात आल्याने त्या बाजूने उभी राहणारी खासगी प्रवासी वाहतूक वाहने स्टेडियममध्ये उभी करण्यात येत आहेत. यामुळे स्टेडियमच्या मुख्य उद्देशास हरताळ फासल्या जात आहे. स्टेडियम हे शहरातील क्रीडा प्रतिभेस वाव देण्यासाठी असते. यामुळे क्रीडाप्रेमींमधून ही भिंत उभारून किवा गेट बांधून बाहेरील हस्तक्षेपापासून स्टेडियमला मुक्त करण्याची मागणी होत आहे. 
 
हाॅटेलचे पाणी मैदानावर 
स्टेडियमच्या चारही बाजूंनी पालिकेचे गाळे आहेत. यातील बसस्टॅन्डच्या दिशेने असलेल्या व्यापारी संकुलातील एका हॉटेल चालकाने भिंतीला छिद्र करून पाइप टाकून स्टेडियमच्या आतमध्ये सांडपाणी सोडले आहे. याचा खेळाडूंसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच स्टेडियमसाठीचे सुरक्षारक्षक केवळ गेटवर बसून कर्तव्य बजावत असल्याने मद्यपीही रात्रीच्या वेळी मैदानातच ठाण मांडून पार्ट्या करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, नवीन भिंतीसाठी प्रस्ताव मंजुरीला... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...